कोरोनाची लस अंतिम टप्प्यात, ट्रम्प यांचा दावा


जगभरात कोरोना लसीवर वेगाने काम सुरू आहे. अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन देखील या शर्यतीत आघाडीवर आहे. यातच आता कंपनीने दावा केला आहे की, त्यांची कोरोना प्रतिबंधक लस अंतिम टप्प्यात पोहचली असून, ज्या स्वयंसेवकांवर या लसींची चाचणी करण्यात आली त्यांच्यावर दिलासादायक परिणाम पाहण्यास मिळाले. कंपनीचे म्हणणे आहे की, या लसीचा एक डोसच पुरेसा आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने याबाबतची माहिती दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पत्रकार परिषदेत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, अमेरिकेतील प्रत्येकी चौथा नागरिक स्वयंसेवक असून, जो कंपनीच्या अंतिम ट्रायलमध्ये पोहचला आहे. आम्ही नागरिकांना आव्हान करतो की कोरोना लसीची चाचणी करण्यासाठी नोंदणीसाठी पुढे यावे.

ट्रम्प म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या इतिहासात सर्वात वेगाने आर्थिक सुधारणांना पुढे नेले. आमचा दृष्टीकोन विज्ञानाला समर्थन करणे हा आहे.

दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या अंतिम टप्प्यातील ट्रायलला सुरूवात झाली आहे. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया, मॅक्सिको आणि पेरुमधील जवळपास 60 हजार लोकांवर याची चाचणी होणार आहे. आतापर्यंतच्या कोणत्या कोरोना ट्रायलच्या तुलनेत हे सर्वात मोठे ट्रायल आहे.