माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर डीन जोन्स यांचे मुंबईत निधन


ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर डीन जोन्स यांचे कार्डिक अरेस्टमुळे निधन झाले. ते इंडियन प्रिमियर लीगच्या ब्रोडकास्टच्या कामासाठी मुंबईत होते. ह्रदयविकाराच्या झटका येण्याआधी त्यांची प्रकृती पुर्णपणे स्थिर होते. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबत ऑस्ट्रेलियात कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे.

आज सकाळी 11 वाजता ब्रेकफास्ट केल्यानंतर ते आयपीएल ब्रोडकास्टच्या ब्रिफिंग सेशनमध्ये देखील सहभागी झाले. त्यानंतर ते राहत असलेल्या दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये ते सहकार्यांशी बोलत असतानाच अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले.

डीन जोन्स काम करत असलेली ब्रोडकास्टर कंपनी स्टार इंडियाने देखील त्यांच्याबाबत निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच, ऑस्ट्रेलियन दुतावासाच्या संपर्कात असल्याचे सांगितले.

1984-1994 दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून खेळताना ते आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखले जात असे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून 52 कसोटी सामन्यात खेळताना 46.55 च्या सरासरीने 3631 धावा केल्या. यात 11 शतकांचा देखील समावेश आहे. 1986 साली भारताविरोधात त्यांनी 210 धावांची खेळी केली होती. भारतातील ऑस्ट्रेलियन खेळाडूची ही सर्वाधिक धावसंख्या आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून 164 एकदिवसीय सामन्यात देखील प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्यांनी 44.61 च्या सरासरीने 6068 धावा केल्या.

जोन्स यांच्या मृत्यूची बातमी समजताच अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.