… तर 100 कोटी भारतीयांना होईल कोरोनाचा संसर्ग, सरकारची चेतावणी


भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरकारचे म्हणणे आहे की जर लोकांना सावधगिरी बाळगली नाही तर भारताच्या जवळपास 85 टक्के म्हणजे 100 कोटी लोकसंख्या कोरोनाबाधित होऊ शकते. नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी याबाबतची चेतावणी दिली आहे. डॉक्टर पॉल म्हणाले की, लोकांनी आता मास्क, सोशल डिस्टेंसिंग सारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. देशातील जवळपास 80 ते 85 टक्के लोक असे आहेत, जे सहज कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकू शकतात. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे व व्हायरस वेगाने पसरत आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले की, व्हायरसच्या मागील विज्ञान असे आहे की तो एका व्यक्तीतून 5 व्यक्तींमध्ये आणि 5 व्यक्तींमधून 50 व्यक्तींमध्ये पसरू शकतो. देशात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरी देशात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोणीही व्हायरसला रोखू शकत नाही. पण काही नियमांचे पालन करून निश्चितच नियंत्रणात आणू शकतो.

आयसीएमआरचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, 80 ते 85 टक्के भारतीय अतिसंवेदनशील श्रेणीत आहेत व इतर 15 टक्के लोक आधीपासूनच संक्रमित झालेले आहेत किंवा त्यांच्यात व्हायरसशी लढण्यासाठी चांगली इम्यूनिटी आहे. आयसीएमआरच्या राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणाच्या परिणामानुसार, बहुतांश लोकसंख्या संक्रमणाच्या बाबती असंवेदनशील आहे. म्हणूनच, संसर्ग रोखण्यासाठी भारताने सार्वजनिक आरोग्य धोरण तयार केले पाहिजे.