रिलायंस रिटेल मध्ये केकेआरची ५५०० कोटींची गुंतवणूक

फोटो साभार न्यूज १८

रिलायंस उद्योगसमूहाची उपकंपनी रिलायंस रिटेल मध्ये १५ दिवसात दुसरी विदेशी गुंतवणूक झाली आहे. आरआरव्हीएल मध्ये जागतिक गुंतवणूकदार कंपनी केकेआरने ५५०० कोटींची गुंतवणूक केले असून ४.२१ लाख कोटी इक्विटी मूल्यांकनावर ही गुंतवणूक केली गेली आहे. यामध्ये केकेआरने रिलायंस रिटेल मध्ये १.२८ टक्के हिस्सा मिळविला आहे.

यापूर्वी केकेआरने रिलायंस जिओ प्लॅटफॉर्मवर ११३६७ कोटी गुंतविले आहेत. बुधवारी रिलायंस रिटेल मधील गुंतवणुकीची घोषणा केली गेली त्यानंतर रिलायंसचा शेअर दोन टक्क्यांनी उसळला. उद्योग तज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे आणखीही विदेशी गुंतवणूकदार रिलायंस रिटेल मध्ये गुंतवणूक करणार आहेत. सप्टेंबर मध्ये अमेरिकन गुंतवणूकदार कंपनी सिल्व्हर लेकने रिलायंस रिटेल मध्ये ७५०० कोटींची गुंतवणूक करून १.७५ टक्के हिस्सा घेतला आहे. त्यानंतर अवघ्या १५ दिवसात ही दुसरी विदेशी गुंतवणूक झाली आहे.