बाजारात आला मास्कफोन

फोटो साभार एमएसएन कॉम

करोना साथीमुळे अनेक टेक कंपन्या नवनवीन उपकरणे बाजारात आणत आहेत. युव्ही स्टरलायझर, डीसइंफेक्टंट, पल्स ऑग्झीमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर अशी ही भलीमोठी यादी आहे. त्यात करोना मुळे मास्कचा वापर अनिवार्य ठरला आहे. याचा फायदा घेऊन हबल कंपनीने मास्कफोन बाजारात आणला आहे. या मास्कमध्ये व्हॉइस अॅक्टीव्हेशन फिचर दिले गेले असून त्यामुळे युजर अलेक्सा, गुगल असिस्टंट, सिरीचा वापर हा मास्क लावलेला असताना करू शकणार आहे. हा मास्क वायरलेस आहे.

मास्कफोन हा मास्कच आहे पण त्यात इअरफोन व मायक्रोफोन कनेक्ट आहेत. त्यामुळे युजर मास्क असतानाही गाणी ऐकणे, कॉल घेणे या सुविधा वापरू शकणार आहे. मास्कफोनमध्ये ईलॅस्टीक न्योप्रेन इअरहुकचा वापर केला गेला आहे. यात मेडिकल ग्रेडचे बदलता येणारे पीएम २.५, एन ९५ एफएफपी.२ फिल्टर, आयपी एक्स ५ फॅब्रिकचा वापर केला गेला आहे. त्यामुळे हे मास्क पाण्याने धुवून पुन्हा वापरता येणार आहेत. एकदा चार्ज केल्यावर १२ तास टॉक टाईम मिळणार आहे.

या मास्कच्या उजवीकडे तीन बटण आहेत. त्यात पॉझ, प्ले, व्हॉलुम कमी करणे, वाढविणे सुविधा आहे शिवाय अन्य फिचर मध्ये डायरेक्ट व्हॉइस असिस्टंट फिचरचा समावेश आहे. परिणामी युजर स्मार्ट होम उपकरणे सुद्धा कंट्रोल करू शकेल. या मास्कफोनची किंमत ४९ डॉलर्स म्हणजे ३६०० रुपये आहे. अद्यापी भारतात हे मास्क उपलब्ध करून दिले गेलेले नाहीत.