… म्हणून एका सेल्फीसाठी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी मागितली माफी


न्यूझीलंडमध्ये अनेक दिवस कोरोनाचे नवे रुग्ण न सापडल्याने तेथील पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचे जगभरात कौतुक करण्यात आले. न्यूझीलंडमधील लोकांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे. लोक आवडीने त्यांच्यासोबत सेल्फी काढत असतात. मात्र एका सेल्फीमुळेच त्यांना माफी मागावी लागली आहे.

जेसिंडा अर्डर्न या Palmerston North च्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी काही लोकांसोबत सेल्फी काढला. मात्र कोरोना संकटात लागू असलेले नियम त्यांनी पाळले नाहीत. त्यांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले नाही. हिच गोष्ट लोकांना आवडी नाही.

आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी अखेर माफी मागितली. जेसिंडा म्हणाल्या की, त्या फोटोमध्ये मी चूक केली. एकतर मी पुढे थांबायला हवे होते किंवा त्यांना अंतर ठेवण्यास सांगायला हवे होते. हे खूपच अवघड आहे. मात्र अनेकदा असे क्षण देखील आले, जेव्हा मी लोकांना हात मिळवण्यास नकार दिला.

न्यूझीलंडमधील नेते जूडिथ कॉलिंस यांनी देखील या फोटोवरून पंतप्रधानांवर टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधांनी लोकांसमोर एक उदाहरण ठेवायला हवे, जेणेकरून त्यातून ते प्रेरणा घेऊ शकतील. Palmerston North मध्ये कोरोनाचे संकट आहे. तेथे लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे गरजेचे आहे.