व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर, फोटो-व्हिडीओ पाठवल्यानंतर आपोआप होणार गायब


इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या एका नवीन फीचरवर काम करत असून, या फीचरचे नाव Expiring Media असल्याचे सांगितले जात आहे. या फीचरमुळे फोटो, व्हिडीओ आणि जीफ फाईल जर तुम्ही कोणाला पाठवल्यास, समोरच्या व्यक्तीने बघितल्यास आपोआप गायब होईल. व्हॉट्सअ‍ॅप मागील काही दिवसांपासून एक्सपायरिंग मेसेजेस या फीचरवर देखील काम करत आहे.

हे फीचर टाइमरवर आधारित असेल. निश्चित केलेल्या वेळेनंतर मेसेज आपोआप गायब होतील. हे दोन्ही फीचर एकच असल्याचे दिसून येते. व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचर्सला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetainfo ने या फीचरचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. यात या नवीन फीचरसाठी वेगळे बटन देण्यात आलेले आहे.

या फीचरमध्ये तुम्ही समोरील व्यक्तीला व्हिडीओ अथवा फोटो पाठवताना  Expiring Media सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही पाठवलेली फाईल पाहिल्यानंतर आपोआप गायब होईल.

दरम्यान, इंस्टाग्राममध्ये आधीपासूनच असे फीचर देण्यात आलेले आहे. इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजमध्ये डिसअपेर होणारे फोटो आणि व्हिडीओ पाठवता येतात. सध्या या नवीन फीचरचे टेस्टिंग सुरू आहे. लवकरच हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.