फोन मार्केटवरही दबदबा निर्माण करणार जिओ, स्वस्तातल्या स्मार्टफोनची ‘एवढी’ असेल किंमत!


मागील अनेक दिवसांपासून रिलायन्स जिओच्या स्वस्तातील स्मार्टफोनची चर्चा सुरू आहे. अगदी कमी किंमतीतील स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी रिलायन्स जिओ स्थानिक कंपन्यांशी भागीदारी देखील केल्याचे सांगितले जाते. आता रिलायन्सच्या या स्वस्त स्मार्टफोनचा खुलासा झाला आहे. कंपनीने स्थानिक पुरवठादारांना फोनचे उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. जेणेकरून, कंपनी 2 वर्षात 20 कोटी स्मार्टफोन यूनिट्स तयार करू शकेल.

कंपनीचा नवीन फोन जिओ फोनचेच एक व्हर्जन असू शकते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, गुगलच्या अँड्राईड आधारित जिओच्या या फोनची किंमत जवळपास 54 डॉलर्स (जवळपास 4 हजार रुपये) असू शकते. हा स्मार्टफोन रिलायन्स जिओच्या स्वस्त प्लॅनसोबत येईल.

रिलायन्सची योजना पुढील 2 वर्षात 15 ते 20 कोटी स्मार्टफोनची विक्री करण्याची आहे. इंडिया सेल्यूलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनुसार, मागील आर्थिक वर्षात भारतात अंदाजे 16.5 कोटी स्मार्टफोन आणि जवळपास एवढेच बेसिक फोन असेंबल करण्यात आले. रिलायन्स जिओचा स्वस्त स्मार्टफोन चीनी कंपन्यांना टक्कर देईल.

दरम्यान, केवळ रिलायन्स जिओच नाही तर भारती एअरटेल देखील 4जी स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे.