व्हिडीओ : मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, कोव्हिड हॉस्पिटलला आले तलावाचे स्वरूप


मुंबईत काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यापासून ते रेल्वे ट्रॅकपर्यंत सर्वत्र पाणी साचले आहे. या पावसाचा कोव्हिडच्या हॉस्पिटलवर देखील परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत असून, मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये पाणी घुसले आहे. या कोव्हिड हॉस्पिटलचे तलावातच रुपांतर झाले आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की संपुर्ण हॉस्पिटलमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. औषध पाण्यात तरंगत आहेत. तर आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून कर्मचाऱ्यांची तपासणी करत आहेत.

रात्रभर जवळपास 9 तास कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. रात्रभराच्या पावसाने बेस्टच्या सेवेवर देखील परिणाम झाला. अनेक वाहने रस्त्यातच बंद पडल्याने वाहतुकीवर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळाला. अनेक रेल्वेची वेळ बदलली आहे, तर ऑफिस बंद ठेवण्यात आली आहेत.