ड्रग्स कनेक्शन प्रकरणात एनसीबीने दीपिका, सारा, श्रद्धा कपूरला बजावले समन्स


अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अनेक मोठी नावे समोर येत आहेत. आता एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर सारख्या कलाकारांना समन्स बजावले आहे. आज तकच्या वृत्तानुसार, या कलाकारांविरोधात ड्रग्स मागण्याचे पुरावे मिळाले असून, याबाबत चौकशी केली जाणार आहे. ड्रग्स कनेक्शनमध्ये आतापर्यंत 18 लोकांना अटक करण्यात आले आहे.

एनसीबीकडून सध्या 7 लोकांना समन्स बजावण्यात आले आहे. या सर्वांना 3-4 दिवसात चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते. दीपिका ड्रग्स मागितल्याचे आरोप झाले होते. चॅटमध्ये याबाबतचा खुलासा झाला होता. क्वान कंपनीमध्ये काम करणाऱ्या करिश्माशी ती बोलत होते.

दीपिका सध्या शूटिंगसाठी गोव्यात असल्याचे सांगितले जाते. तसेच करिश्माला देखील एनसीबीने समन्स बजावले असून, ती देखील गोव्यात आहे. तर सारा देखील आपल्या आईसोबत गोव्यातील घरी आहे.