रियाची लायकी काढणाऱ्या बिहार डीजीपींची निवृत्ती, राजकीय आखाड्यात उतरण्याची शक्यता


अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली आहे. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता, जो त्वरित स्विकारण्यात आला. निवृत्तीनंतर आता ते राजकीय आघाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून, बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी एसके सिंघल यांना बिहारचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.

मागील अनेक दिवसांपासून गुप्तेश्वर पांडे यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती व ते बक्सरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांपुर्वी त्यांना बक्सर जिल्ह्याचा दौरा देखील केला होता व जनता दल युनायटेडच्या जिल्हाध्यक्षाची भेट घेतली होती. त्यांनी पाटणामध्ये इतर नेत्यांची देखील भेट घेतली होती.

गुप्तेश्वर पांडे यांचे एनडीएच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. वर्ष 2009 मध्ये देखील त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र त्यांना तिकिट मिळाले नव्हते. अखेर आपल्या चांगल्या संबंधांमुळेच ते पुन्हा सेवेत रुजू झाले. यंदा शिक्षक दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्वांसमोर त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे सांगितले होते.