५०० वर्षे जुना कायदा बदलण्यास भाग पाडणारे लग्न

फोटो साभार डेली मेल

प्रेमाला वयाचे, जातीचे, भाषेचे, सीमेचे कसलेच बंधन नसते. लंडन मध्ये असा एक प्रकार घडला की ज्यामुळे ब्रिटनला त्याच्या ५०० वर्षे जुन्या विवाह कायद्यात बदल करणे भाग पडले आणि अखेर प्रेमाचा विजय झाला.

क्लाईव्ह ब्लंडेन याने चक्क त्याच्या सासूशी लग्न करून सासुबरोबर लग्न करणारा पाहिला जावई अशी कामगिरी बजावणारा पाहिला पुरुष बनण्याचा विक्रम सुद्धा यामुळे केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्लाईव्ह ६५ वर्षाचा असून त्याची सासू ७७ वर्षाची आहे. गेली ३३ वर्षे ते एकत्र राहत आहेत. ३० वर्षापूर्वी क्लाईव्हने पत्नीपासून घटस्फोट घेतला होता व तेव्हापासून तो सासूबरोबर राहत होता. १९९७ साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण तसे जाहीर करताच क्लाईव्हला अटक केली गेली.

ब्रिटनच्या कायद्यानुसार ज्येष्ठ व्यक्तीने मुलांबरोबर शारीरिक संबंध ठेवणे अपराध आहे. क्लाईव्ह जावई म्हणजे सन इन लॉ असल्याने सासू त्याचबरोबर शारीरिक संबंध ठेऊ शकत नव्हती. क्लाईवला या अपराधाबद्दल ७ वर्षाची शिक्षा झाली पण त्याविरोधात अपील करताच ही शिक्षा १० वर्षे करण्यात आली.

क्लाईव्ह सांगतो कोर्टाच्या निकालामुळे मी माझा सासूसोबत लग्न करण्याचा निर्णय बदलीन असे सगळ्यांना वाटले पण मी तसे केले नाही. शेवटी मानवाधिकार कार्यकर्ते त्याचा मदतीला आले आणि सात युरोपियन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही केस आली तेव्हा त्यांनी या विवाहाला अडचणीचे ठरणारे कलम १२ हटविण्याचा निर्णय घेतला. परिणामी क्लाईव्हच्या प्रेमाचा विजय होऊन त्यांनी लग्न केले.