मिशन नासा, चंद्रावर पुन्हा उतरणार माणूस

फोटो साभार बियोंड इन्फिनिटी

नासाने आखलेल्या आर्टेमिस मिशन प्रमाणे २०२४ मध्ये पुन्हा एकदा चंद्रावर माणूस उतरणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकन कॉंग्रेसने २८ अब्ज डॉलर्स म्हणजे २ लाख कोटी रक्कम मंजूर केली आहे. यातील १६ अब्ज डॉलर्स लँडिंग एअरक्राफ्टवर खर्च होणार आहेत.

अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच या योजनेला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चंद्रावर पुन्हा एकदा माणूस उतरणे याला डोनल्ड ट्रम्प यांनी प्राथमिकता दिली असून त्यांच्यासाठी ही सर्वाधिक आनंदाची बाब असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. नासाचे प्रशासकीय अधिकारी व आर्टेमिस मिशनशी संबंधित असलेले जिम ब्राईडेंस्टाइन यांनी या संदर्भात फोनवरून पत्रकारांची बातचीत केली.

जिम म्हणाले, नासावर नेहमीच राजकीय दबाव असतो. निवडणूक काळात हा दबाब अधिक असतो. चंद्रावर स्वारीचा प्रोग्राम यापूर्वी नसणे बनविला होता पण तेव्हा तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी तो रद्द केला होता. ट्रम्प मात्र त्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यास तयार आहेत. यावेळी आमचे अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरतील. तीन टप्प्यात हे मिशन पूर्ण होणार आहे. त्यात २ अंतराळवीर सामील असतील आणि त्यातील एक महिला असेल. ओरियन नावाच्या अंतराळ यानातून ते चंद्रावर जाणार आहेत.