चीनला दणका, वंदे भारत ट्रेनसाठी केवळ भारतीय कंपन्यांनाच लावता येणार बोली


भारतीय रेल्वे 44 वंदे भारत ट्रेन्ससाठी 2000 कोटी रुपयांच्या बोली मागवत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली समजली जात आहे. विशेष म्हणजे वंदे भारत ट्रेन्सशी संबंधित कामांसाठी मागवली जाणारी बोली ही केवळ भारतीय कंपन्यांसाठीच असणार आहे. याआधी चीनच्या सीआरआरसी कंपनीने देखील बोली लावण्यासाठी रस दाखवला होता.

आता 44 वंदे भार ट्रेन्ससाठी बोली ऑनलाईन व लाईव्ह होईल. यात केवळ भारतीय कंपन्याच बोली लावू शकतील व जो कमी बोली लावेल, त्या कंपनीला टेंडर मिळेल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत मेक इन इंडिया आणि स्थानिक उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देता येईल, यासाठी हे पाऊल उचलले आहे. टेंडरनुसार या ट्रेन्सची निर्मिती आयसीएफ चेन्नई, आरसीएफ कपूरथला आणि एमसीएफ रायबरेलीमध्ये होईल.