कोरोना : ऑक्सफोर्ड-स्पुटनिक नाही, सर्वात प्रथम मिळणार या कंपनीची लस!


जगभरात अनेक कोरोना प्रतिबंधल लसी या अंतिम टप्प्यात आहे. ऑक्सफोर्ड आणि स्पुटनिक-व्ही या लसी सर्वात प्रथम लोकांसाठी उपलब्ध होतील, अशी अनेकांना आशा आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, फाइजर (Pfizer) कंपनीची लस सर्वात प्रथम यशस्वी होऊ शकते व लोकांना मिळू शकते.

एका मुलाखतीमध्ये ट्रम्प म्हणाले की, फाइजरची कोरोना लस चांगले परिणाम दर्शवत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीसाठी थोडा विलंब होऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. फाइजरच्या कोरोना लसीने क्लिनिकल ट्रायलमध्ये चांगले परिणाम दर्शवले आहेत.

याआधी व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, अमेरिकन लोकांना डिसेंबरपर्यंत कोरोना लस मिळू शकते. सर्वात प्रथम वृद्ध आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळेल. अमेरिकेची आरोग्य संस्था सीडीसीने एक टाईमलाईन देखील जारी केली आहे. सीडीसीने अमेरिकेतील राज्यांना जानेवारीपर्यंत लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. सोबत लस मोफत असेल, असेही स्पष्ट केले आहे.