… तर कायमचे ट्विटर सोडून देईन, कंगनाचे खुले आव्हान


कृषी विधेयकाला पंजाब, हरियाणासह देशभरातील शेतकरी विरोध करत आहेत. संसदेत विधेयकांना गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे मंजूर करण्यात आल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. प्रत्येक विषयावर भाष्य करणाऱ्या कंगना यावर देखील मत व्यक्त करत, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली. यावरून कंगनावर जोरदार टीका होत आहे.

यावर आता कंगना तिच्यावर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाल्याचा आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला असून, हे सिद्ध केल्यास आपण कायमचे ट्विटर सोडू असेही म्हटले आहे.

कंगना आपले जूने ट्विट रिट्विट करत लिहिले की, जशी श्रीकृष्णाची एक नारायणी सेना होती, तशीच पप्पूची देखील स्वतःची एक चंपू सेना आहे. ज्यांना केवळ अफवांवरच लढणे माहित आहे. हे आहे माझे मुख्य ट्विट. मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाल्याचे जर कोणी सिद्ध केले तर मी माफी मागून कायमचे ट्विटर सोडून देईल.