भारतात लग्न करण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. अर्थात हे पैसे सरकार नाही तर स्वतःच्या खिश्यातून खर्च केले जातात. मात्र एक देश असाही आहे, जेथे लग्न केल्यावर सरकारकडून तुम्हाला 4.20 लाख रुपये मिळतात. हे पैसे नवविवाहित जोडप्याने आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी यासाठी दिले जातात. हा देश जपान असून, येथील सरकारने घोषणा केली आहे की जोडपी त्यांच्या या योजनेत नाव नोंदवू शकतात व पात्रतेनुसार पैसे मिळतील.
या देशात लग्न केल्यावर सरकार देणार लाखो रुपये, जाणून घ्या नियम
जपान अशा लोकांना पैसे देईल जे आर्थिक तंगीमुळे लग्न करू शकत नाही. कारण या देशात जन्मदर चिंतेचा विषय आहे. नवविवाहितांना सरकारकडून 4.2 लाख रुपये दिले जातील. ही मदत योजना पुढील वर्षी एप्रिलपासून सुरू होणार आहे. लोक उशीरा लग्न करतात अथवा अविवाहित राहिल्याने देशातील जन्मदरावर प्रभाव पडतो. जन्मदर सुधारण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.
मात्र यासाठी काही अटी देखील आहेत. लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्यांचे वय हे 40 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. याशिवाय एकूण उत्पन्न 38 लाखांपेक्षा कमी असावे. 35 वय असणाऱ्यांसाठी अटी वेगळ्या असून, त्यांचे उत्पन्न 33 लाख रुपये असल्यास यांना 2.1 लाख रुपये मदतनिधी दिला जाईल.
मागील काही वर्षात जपानमधील जन्मदरात घट झाली आहे. मागील वर्षी सरासरी बाळाला जन्म घालण्याची संख्या 1.36 एवढी होती. 2019 मध्ये 865,000 बाळांना जन्म दिला. मागील रेकॉर्डपेक्षा हा आकडा कमी आहे.