आयपीएलच्या पहिल्या सामन्यानेच केला वर्ल्ड रेकॉर्ड, इतक्या कोटी लोकांनी पाहिला सामना


आयपीएलबाबत लोकांमध्ये उत्साह पाहण्यास मिळत असून, पहिल्या सामन्यापासून कोट्यावधी लोक यंदाच्या आयपीएलचा आनंद घेताना पाहण्यास मिळत आहे. भलेही यंदाचे आयपीएल दुबईत होत आहे, मात्र तरीही प्रेक्षक इंटरनेटच्या माध्यमातून आयपीएलशी जोडलेले आहेत. खास गोष्ट म्हणजे आयपीएलच्या पहिल्याच सामन्याने व्यूअरशिपचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत सांगितले की, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समधील पहिला सामना जवळपास 20 कोटी लोकांनी पाहिला. हा एक विक्रमच आहे.

जय शाह यांनी ट्विट केले की, ड्रीम 11 आयपीएलने नवीन रेकॉर्ड केला आहे. बार्कनुसार, 20 कोटी लोकांनी सामना पाहिला. कोणत्याही देशात कोणत्याही स्पोर्ट्सलीगसाठी ही सर्वोत मोठी ओपनिंग व्यूअरशिप आहे. ही एकूण स्टारस्पोर्ट्स इंडिया आणि डिज्नी+ हॉटस्टारची व्यूअरशिप आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्या धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्न सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला होता.