हाच का बहिष्कार ? चीनच्या बँकेने खरेदी केली बजाज फायनान्समध्ये हिस्सेदारी


भारत-चीन सीमेवर तणावाचा स्थिती आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी केली जात आहे. यातच आता चीनची सेंट्रल बँक पिपल्स बँक ऑफ चाइनाने (पीबीओसी) आणखी एका कंपनीत हिस्सेदारी खरेदी केल्याची माहिती समोर आली असून, पीबीओसीने एचडीएफसी आणि आयसीआयसीआयनंतर बजाज फायनान्समध्ये गुंतवणूक केली आहे. याबाबतचे वृत्त न्यूज18 ने दिले आहे.

बजाज फायनान्समध्ये चीनच्या बँकेने 1 टक्क्यांपेक्षा कमी हिस्सेदारी खरेदी केली आहे. त्यामुळे स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तज्ञांचे म्हणणे आहे की या तिन्ही कंपन्यांमध्ये चीनच्या सेंट्रल बँकेची गुंतवणूक खूपच कमी असल्याने, चिंतेचे काहीही कारण नाही.

मागील महिन्यात पीबीओसीने देशातील खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँक आयसीआयसीआयमध्ये गुंतवणूक केली होती. दोन्ही देशातील वाढत्या तणावाच्या स्थितीमध्ये ही गुंतवणूक झाल्याने यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.