3 वर्षात चीनने भारतीय सीमेजवळ एअरबेस, एअर डिफेंस आणि हेलिपोर्टची संख्या केली दुप्पट – रिपोर्ट


सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन सीमेवर जवानांची संख्या वाढवत असल्याची माहिती अनेकदा समोर येते. रिपोर्टनुसार, मागील 3 वर्षात चीनने भारतीय सीमेजवळ एअरबेस, एअर डिफेंस पोजिशन आणि हेलिपोर्ट्सची संख्या दुप्पट केल्याची माहिती समोर आली आहे. 2017 मध्ये दोन्ही देशात डोकलाम येथे झालेल्या संघर्षानंतर चीनने आपल्या रणनिती बदलाव केल्याचे दिसून येते. यामुळे चीनला पुढे जाऊन आपले ऑपरेशन्स वाढवण्यास मदत मिळेल. याबाबतचे वृत्त एनडीटिव्हीने दिले आहे.

जिओपॉलिटिकल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म Stratfor च्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये चीनने उभारलेल्या पायाभूत सुविधांची माहिती सेटेलाईट इमेजद्वारे सविस्तररित्या देण्यात आली आहे. चीनच्या सैन्याच्या संरचनेचा थेट परिणाम भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतो.

Stratfor चे वरिष्ठ ग्लोबल एनालिस्ट आणि रिपोर्टचे लेखक सिम टँक म्हणाले की, सीमेवर चीनी सैन्याद्वारे करण्याच येणारी पायाभूत सुविधांची निर्मिती दर्शवते की लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात नियंत्रण मिळवण्याचा एक भाग आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीनकडून पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणा पुर्ण होण्यासाठी खूप वेळ लागेल. अनेक कामे अद्याप सुरू आहेत. भारतीय सीमेवर चीनी सैन्याच्या ज्या हालचाली पाहत आहोत, त्या दीर्घकालीन उद्दीष्टांची सुरुवात आहे.

रिपोर्टनुसार, चीन भारतीय सीमेजवळ कमीत कमी 13 नवीन सैन्य पोजिशनची निर्मिती करत आहे. ज्यात 3 एअर बेस, 5 स्थायी एअर डिफेंस पोजिशन आणि 5 हेलीपोर्ट्सचा समावेश आहे. यातील 4 हेलीपोर्ट्सची प्रक्रिया मे नंतर सुरू झाली आहे.