बिना मास्क राज ठाकरे यांनी रोरो बोटीवर भरला दंड

फोटो साभार मुंबई मिरर

कोविड १९ साथीमध्ये बिना मास्क वावरणाऱ्या लोकांना दंड ठोठावला जात आहे. त्याचा फटका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही बसला. राज ठाकरे यांनी नियम मोडल्याचे मान्य करून १ हजार रुपये दंड भरला असेही समजते.

मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय दोस्तांसह रोरो बोटीतून प्रवास करत होते. त्यावेळी राज ठाकरे बोटीच्या डेकवर आले तेव्हा त्यांनी मास्क लावलेला नव्हता. बोटीवरील नाविक अधिकाऱ्याने राज यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे सांगून नियम मोडला गेल्याची जाणीव करून दिली तेव्हा राज यांनी ताबडतोब ते मान्य करून नियमानुसार असलेला १ हजार रुपये दंड भरला. राज ठाकरे मुंबई मांडवा रोरो बोटीतून प्रवास करत होते.

मनसेचे अन्य नेते नितीन सरदेसाई यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे व राज ठाकरे यांनी कोणताही नियम मोडला नसल्याचे सांगितले असले तरी बोटीवर विना मास्क उभे असलेल्या राज ठाकरे यांचे फोटो मिडिया मधून झळकले आहेत.

रोल ऑन रोल ऑफ म्हणजेच रोरो पॅसेंजर फेरी सेवा मुंबई मांडवा या दरम्यान असून या बोटीतून वाहनांसह प्रवासी प्रवास करू शकतात. ही सेवा मार्च मध्ये सुरु झाली होती.