डेनियल क्रेग निवृत्त, नवा जेम्स बॉंड- टॉम हार्डी

फोटो साभार एचएनएच स्टाईल

हॉलीवूड मध्ये बऱ्याच काळानंतर जेम बॉंड परत आला असून जेम्स बॉंड सिरीज मधील अपकमिंग चित्रपट ‘नो टाईम टू डाय’चे ट्रेलर नुकतेच लाँच केले गेले आहे. यात जेम्स बॉंड डेनियल क्रेग नेहमीच्या बॉंड सिग्नेचर लुक मध्ये दिसतो आहे. हातात छोटे पिस्तुल, ब्लॅक कोट या नेहमीच्या पोशाखात तो दिसत आहे. मात्र या नंतर क्रेग जेम्स बॉंड म्हणून पुन्हा दिसणार नाही. त्याच्या जागी टॉम हार्डी हा नवा जेम्स बॉंड यापुढे बॉंडपटामधून दिसणार आहे.

या संबंधात अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र वॉलकॅनच्या रिपोर्टनुसार जुन मधेच टॉम हार्डीची ऑडिशन होऊन तो जेम्स बॉंडच्या भूमिकेसाठी तयार झाला आहे. नोव्हेंबर मध्ये टॉम हार्डीच्या नावाची नवा जेम्सबॉंड म्हणून घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र करोना मुळे ती शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

‘नो टाईम टू डाय’ हा जेम्स बॉंड सिरीज मधील २५ वा चित्रपट असून डेनियल क्रेग यात पाचव्यावेळी भूमिका साकारत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर मध्ये रिलीज होणार आहे.