काय आहे आयपीएल मधील बायो बबल

फोटो साभार दैनिक जागरण

युएई मध्ये १९ सप्टेंबर पासून आयपीएल २०२० स्पर्धा सुरु झाल्यापासून सतत बायो बबल बनविले गेल्याची चर्चा कानावर पडते आहे. काय आहे हे बायो बबल? तर ते आहे विशिष्ठ प्रकारे सांभाळले जात असलेले वातावरण. या बायो बबल बाहेर गेल्यास खेळाडूंना दोषी ठरवून शिक्षा सुनावली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

करोना साथीमुळे सर्व खेळाडू, कोच, सहकारी स्टाफ, हॉटेल स्टाफ याना या बायो बबल मध्येच राहावे लागणार आहे. याचा अर्थ असे एक वातावरण ज्यातून बाहेरच्या दुनियेत राहणाऱ्या कुणाच्याही संपर्कात येता येणार नाही. यासाठी सर्व खेळाडू आणि वरील संबंधित यांच्या करोना टेस्ट अगोदरच केल्या गेल्या आहेत. आयपीएल संघ २० ऑगस्ट पासून येथे दाखल होऊ लागले तेव्हाही करोना टेस्ट करून त्यांना नियमाप्रमाणे विलगीकरणात ठेवले गेले व त्याकाळात सुद्धा तीन वेळा करोना चाचण्या केल्या गेल्या आहेत. या चाचण्या करणाऱ्या मेडिकल स्टाफला सुद्धा बाहेर जाण्याची परवानगी नाही.

यामुळे खेळाडू फक्त मैदान आणि हॉटेल येथेच जाऊ शकतात. नातेवाईक, मित्र याना भेटू शकत नाहीत. सामन्यांचे प्रसारण करणाऱ्या टीम साठी वेगळा बबल बनविला गेला आहे. अगदी तातडीने एखाद्याला बबल बाहेर जाण्याची वेळ आली तर त्याला पुन्हा विलगीकरणात राहावे लागणार आहे.

इंग्लंड सिरीज साठी सुद्धा असे इको किंवा बायो बबल बनविले गेले होते असेही समजते.