शिवसेना हा गोंधळलेला पक्ष, देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका


कृषी विधेयकावरून लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना हा गोंधळलेला पक्ष असल्याचे ते म्हणाले. ते नागपूरमध्ये कृषी विधेयकाबाबत बोलत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जर कृषी विधेयक एवढे क्रांतीकारी आहे, तर सरकार कोणत्याही शेतकऱ्याचा आत्महत्येमुळे मृत्यू होणार नाही असे आश्वासन देणार का ?, असा सवाल केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष आहे. ते अनेक मुद्यांवर भूमिका घेऊ शकत नाही व त्यांनाही याची सवय झाली आहे. आता आम्हाला त्याचे नवल वाटत नाही.

फडणवीस म्हणाले की, जेव्हा ते आमच्यासोबत सत्ते होते त्यावेळी ते सत्ताधारी आणि विरोधक अशी दोन्ही भूमिका बजावत होते. शिवसेनेने स्वतःची भूमिका स्पष्ट करायला हवी. शेतीविषयी देखील त्यांनी कधीच भूमिका घेतली नाही. आता त्यांचा पक्ष सत्तेत आहे. राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, असे ते आश्वासन देतील का ? हे केवळ राजकारण आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील राज्यसभेत विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते, असे म्हटले.