वाचाळ कंगनाचे पुन्हा वादग्रस्त विधान, शेतकऱ्यांना म्हणाली ‘दहशतवादी’


राज्यसभेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांना जोरदार विरोध होत आहे. पंजाब, हरियाणामध्ये प्रामुख्याने या विधेयकांना विरोध होत आहे. यातच आता या विधेयकांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभिनेत्री कंगना राणावतने दहशतवादी असा उल्लेख केल्याने मोठेच वांदग उठले आहे.

राज्यसभेत कृषि विधेयकांना मंजूरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले की, मी आधीही सांगितले आहे व पुन्हा सांगतो की एमएसपीची व्यवस्था सुरू राहील व सरकारी खरेदी देखील जारी राहील. मोदींचे हे ट्विट रिट्विट करत कंगनाने शेतकऱ्यांची तुलना सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्यांशी करत, शेतकऱ्यांचा दहशतवादी असा उल्लेख केला.

कंगनाने लिहिले की, पंतप्रधान मोदीजी जे झोपले आहे त्याला उठवता येते, ज्या गैरसमज असतील त्याला समजवता येते. मात्र जो झोपण्याचे नाटक करत असेल, न समजण्याचे नाटक करत असेल, त्याला समजावून काय फरक पडणार आहे ? हे तेच दहशतवादी आहेत. सीएएमुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही, मात्र यांनी रक्ताचे पाट वाहिले.

कंगनाने कृषी विधेयकांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याने आता तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे.