कृषी विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ घालणारे 8 खासदार निलंबित


कृषी विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारकडून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ज्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे.

राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांनी डेरेक ओब्रायन यांचे नाव घेत त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. तर विरोधी पक्षाकडून उपसभापतींच्या विरोधात सादर करण्यात आलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला. राज्यसभेचे सभापती म्हणाले की, जे काल घडले त्याबाबत मला दुःख आहे. हा राज्यसभेसाठी वाईट दिवस होता. काही सदस्यांनी उपसभापतींवर कागद फेकले. उपसभापतींनुसार, त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले. सभागृहात माइक तोडणे अस्विकार्य आणि निंदनीय आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक, 2020 विधेयकांचा विरोध केला होता. मात्र आवाजी मतदानाद्वारे या विधेयकांना मंजूरी देण्यात आली.