नारीशक्ती! राफेलच्या स्क्वाड्रनमध्ये होणार महिला पायलटचा समावेश


भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात काही दिवसांपुर्वीच लढाऊ विमान राफेलचा समावेश झाला आहे. आता राफेल विमानाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्क्वाड्रनमध्ये लवकर एका महिला फायटर पायलटचा समावेश होऊ शकतो. राफेलला हवाई दलाच्या 17व्या स्क्वाड्रननमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी आता हवाई दलाच्या 10 महिला फायटर पायलटला प्रशिक्षण दिले जात आहे, ज्यातील एका पायलटची निवड होईल.

याच महिन्यात काही दिवसांपुर्वी राफेल विमानांचा अंबाला येथे हवाई दलात समावेश करण्यात आला. आतापर्यंत पहिली खेप भारतात आली असून, 2021 पर्यंत सर्व 36 विमान भारतात दाखल होतील. ज्या महिला पायलटला प्रशिक्षण देण्यात येत आहे, त्या सध्या सर्व मिग-21 वर तैनात आहेत. प्रशिक्षणानंतर महिला पायलटची राफेलसाठी निवड केली जाईल.

हवाई दलातील 10 महिला फायटर पायलट अनेक लढाऊ विमाने उडवत आहेत. 2016 मध्ये फ्लाइट लेफ्टिनेंट अवनी चतुर्वेदी, फ्लाइट लेफ्टिनेंट भावना, फ्लाइटा लेफ्टिनेटं मोहना सिंह या फाइटर पायलट झाल्या होत्या. सध्या हवाई दलात जवळपास 300 लढाऊ पायलट्सची कमतरता आहे.