आता प्राचीन औषधांमध्ये कोरोनाचा उपचार शोधणार डब्ल्यूएचओ


कोरोना व्हायरस महामारीला नष्ट करण्यासाठी जगभरात वेगाने लसीवर काम सुरू आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटना प्राचीन औषधांमध्ये कोव्हिड-19 वरील उपचार शोधण्याचा प्रयत्न करत आहे. डब्ल्यूएचओ पहिल्यांदाच या आजारावरील उपचार हर्बल औषधांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. संस्थेने या आजारावरील उपचारासाठी हर्बल औषधांच्या टेस्टिंग प्रोटोकॉलचे समर्थन केले आहे.

डब्ल्यूएचओने या आजाराशी लढण्यासाठी प्राचीन औषधांच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला आहे. पुर्व आफ्रिकेतील देश मदागास्करचे राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांच्याद्वारे मलेरियाच्या उपचारासाठी एक औषधीय रोपटे आर्टमीसियाद्वारे बनलेल्या ड्रिंकबाबत माहिती दिल्यानंतर डब्ल्यूएचओने हे पाऊल उचलले आहे.

अँड्री राजोएलिना कोव्हिड ऑर्गेनिक्स ड्रिंकला (सीव्हीओ) प्रोमोट करत आहे. राजोएलिनाने हे ड्रिंक कोव्हिड-19 वरील उपचारासाठी परिणामकारक असल्याचे म्हटले आहे. आता हे ड्रिंक आफ्रिकेतील अन्य देशात देखील पोहचवले जात आहे. डब्ल्यूएचओचे तज्ञ आणि अन्य दोन संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी हर्बल मेडिसिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या प्रोटोकॉलचे समर्थन केले आहे. डब्ल्यूएचओचे स्थानिक संचालक प्रॉस्पर टुमुसीम म्हणाले की, जर प्रोचीन औषधीय उत्पादन सुरक्षा, प्रभाव आणि गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्वांवर खरे ठरत असल्यास डब्ल्यूएचओ याच्या फास्ट ट्रॅक आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी शिफारस करेल.

टुमुसीम म्हणाले की, पश्चिम आफ्रिकेत इबोलाप्रमाणेच कोव्हिड-19 मुळे मजबूत आरोग्य प्रणाली असण्याची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे प्राचीन औषधांसह संशोधन आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम्सला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.