10 हजार फूट उंचीवर स्थित जगातील सर्वात लांब बोगदा देशात बनून तयार झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 3 ऑक्टोंबरला या बोगद्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील मंत्री रामलाल मार्कंडेय यांनी पंतप्रधानांच्या येण्याची तयारी सुरू केली आहे. या बोगद्याच्या निर्मितीसाठी 10 वर्ष लागले. या बोगद्यामुळे मनाली ते लेहमधील अंतर 46 किमीने कमी झाले आहे. या बोगद्याला अटल रोहतांग टनल असे नाव देण्यात आलेले आहे.
जगातील सर्वात लांब बोगदा बनून तयार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
हा बोगदा रोहतांग पासला जोडून बनविण्यात आला आहे. हा जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वात लांब बोगदा आहे. हा बोगदा जवळपास 8.8 किमी लांब आणि 10 मीटर रुंद आहे. मनाली-लेह रोडवर आणखी चार बोगदे प्रस्तावित आहेत. हा बोगदा केवळ मनाली ते लेहच नाही, तर हिमाचल प्रदेशमधील लाहौल-स्पितीमधील प्रवास देखील सोपा बनवेल.
या बोगद्याचा सर्वाधिक फायदा लडाखमध्ये तैनात भारतीय जवानांना होणार आहे. यामुळे हिवाळ्यात देखील शस्त्र आणि इतर वस्तूंचा पुरवठा सहज होऊ शकेल. आता केवळ जोजिला पासच नाही, तर या मार्गाने देखील जवानांपर्यंत वस्तूंचा पुरवठा करता येईल. या बोगद्याच्या आत कोणतेही वाहन ताशी 80 किमी वेगाने चालवता येईल. हा बोगदा बनविण्याची सुरुवात बॉर्डर रोड संस्थेने (बीआरओ) 28 जून 2010 ला केली होती. घोड्याच्या नाळेच्या आकारात हा बोगदा तयार करण्यात आला आहे.
येथील तापमान माइनस 30 डिग्री असते. बोगद्यासाठी 8 लाख क्यूबिक मीटर दगड आणि माती काढावी लागली. हिवाळ्या येथे दररोज 5 मीटर खोदकाम होत असे. मात्र हिवाळ्यात केवळ अर्धा मीटर खोदकाम होत असेल. त्यामुळे बीआरओच्या कर्मचारी आणि इंजिनिअर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या बोगद्यातून एकाचवेळी 3 हजार कार आणि 1500 ट्रक्स जाऊ शकतात. याच्या निर्मितीसाठी जवळपास 4 हजार कोटी रुपये खर्च आला. याच्या आत ऑस्ट्रियन टनलिंग मेथडचा उपयोग करण्यात आला आहे.