पायल घोष दाखल करणार अनुराग कश्यप विरोधात तक्रार


दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणात आज पायल घोष अनुराग कश्यपविरोधात मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवणार आहे. संसदेत देखील हे प्रकरण गाजत आहे. खासदार रुपा गांगुली यांनी देखील या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी केली आहे बॉलिवूडमधील काही कलाकार अनुरागला पाठिंबा देखील देत आहेत.

आज तकच्या वृत्तानुसार पायल घोष म्हणाली की, अनुराग आरोप तर नाकारणाच. माझे सत्य माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत सिद्धी विनायक आहे. अनुराग कश्यप ड्रग्स घेतो का ? याबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, त्याला धुम्रपान करताना पाहिले आहे, मात्र ते काय होते आपल्याला माहित नाही. तसेच, पायल घोष आज अनुरागविरोधात तक्रार दाखल करणार आहे.

दुसरीकडे अनुराग कश्यपने आपल्यावरील आरोपाचे खंडन केले आहे.  अनुराग कश्यपची वकील प्रियंका खिमाणी म्हणाली की, माझ्या क्लाइंटला या आरोपांमुळे मोठा धक्का पोहचला असून, हे आरोप पुर्णपणे खोटे, निंदनीय आणि चुकीचे आहेत.