नव्याने आलेल्या पहिल्या महिंद्रा थारचा लिलाव होणार

फोटो साभार नवभारत टाईम्स

पूर्णपणे नव्या रुपात महिंद्रा थार २०२० कंपनीने १५ ऑगस्ट रोजी सादर केली होती आणि २ ऑक्टोबरला तिचे लाँचिंग केले जात आहे. या एसयुव्हीचे अधिकृत बुकिंग अद्याप सुरु झाले नसले तरी पहिली गाडी मिळविण्याची संधी ग्राहकांना मिळू शकणार आहे. याचे कारण म्हणजे पहिल्या महिंद्रा थार २०२०चा लिलाव केला जाणार असून त्यासाठी रजिस्ट्रेशन १९ सप्टेंबर पासून सुरु झाले आहे. हा लिलाव २४ ते २७ सप्टेंबर या काळात केला जाणार असून यातून मिळणारी रक्कम कोविड १९ लढयासाठी दान केली जाणार आहे.

या पहिल्या स्पेशल थार एसयुव्हीची निवड पाच व्हेरीयंट कलर ऑप्शन मधून करता येणार आहे. या एसयुव्हीवर THAR#1 असे स्पेशल बॅजिंग असेल आणि डॅशबोर्डवर डेकोरेटीव्ह प्लेटवर सिरीयल नंबर १ असे लिहिलेले असेल. यात लेदर सीट दिल्या जाणार आहेत. अर्थात महिंद्राची असा लिलाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जावा मोटारसायकलच्या पहिल्या बॅच चा लिलाव केला गेला होता आणि ती रक्कम दान केली गेली होती. ज्यांना या लिलावात भाग घ्यायचा आहे त्यांना त्यासाठी नोंदणी करावी लागेल आणि काही रक्कम डिपॉझीट करावी लागेल असे सांगितले जात आहे.

या एसयुव्हीचे एक्स्टेरीअर तसेच इंटेरीअर नवीन डिझाईनचे आहे. त्यात टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, रुफ माउंटेड स्पीकर्स, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल, पॉवर विंडोज, हाईट अॅडजस्ट फ्रंट सीट, रिमोट क्लिप सह सेंट्रल लॉकिंग सुविधा आहेत. पेट्रोल आणि डिझेल अश्या दोन्ही प्रकारात ही एसयूव्ही उपलब्ध आहे शिवाय तिला सहा स्पीड मॅन्यूअलसह ऑटोगिअर बॉक्स दिली गेली आहे.