स्विझर्लंडच्या झुरिक मध्ये सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम

चॉकलेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम स्वित्झर्लंडच्या झुरिक मध्ये सुरु झाले असून १३ सप्टेंबर रोजी त्याचे उद्घाटन टेनिस स्टार रोजर फेडरर याच्या हस्ते केले गेले. या म्युझियम मध्ये दरवाजापासून सर्व चॉकलेट पासून बनविले गेले असून लिंट होम ऑफ चॉकलेट असे त्याचे नाव आहे.

या म्युझियम मध्ये उभारले गेलेले ३० फुटाचे चॉकलेट कारंजे हे प्रमुख आकर्षण आहे. प्रेक्षकांना आत प्रवेश करताच हे कारंजे सर्वप्रथम दिसेल. झुरिकची ओळख चॉकलेटची राजधानी अशीही आहे. येथेच जगातील सर्वात मोठी लिंट चॉकलेट शॉप आहेत. येथे येणारे प्रेक्षक काही भेटवस्तू बरोबर नेऊ शकणार आहेत. चॉकलेटच्या इतिहासापासून उत्पादनापर्यंत पूर्ण माहिती येथे मिळू शकेल. तसेच चॉकलेटेरिया मध्ये प्रेक्षकांना स्वतः चॉकलेट बनविण्याची संधी मिळणार आहे.