लाल आणि नेव्ही ब्लू कलर मध्ये येणार आयफोन १२

फोटो सौजन्य गिक

नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अॅपलने नवा आयफोन १२ सादर केला नसला तरी या वर्षाच्या अखेरी चार व्हेरीयंट मध्ये आयफोन १२ येत असल्याची घोषणा केली आहे. नव्या माहितीनुसार आयफोन १२, १२ मॅक्स, १२ प्रो आणि १२ प्रो मॅक्स अश्या चार व्हेरीयंट मध्ये येत असून लाल आणि नेव्ही ब्ल्यू कलर ऑप्शन मध्ये येईल असेही समजते. अॅपल ने यापूर्वी रेड कलर मध्ये आयफोन आणला आहे मात्र आयफोन एक्स नंतर रेड कलर मध्ये फोन आलेला नाही.

आयफोन १२ संदर्भात अनेक वेळा लिक्स आले आहेत त्यात किमतीपासून डिझाईन पर्यंत वेळोवेळी अफवा आल्या आहेत. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट नुसार या फोनचे डिझाईन आयफोन ४ प्रमाणे असेल. हे मॉडेल १० वर्षे जुने आहे. २०१० मध्ये ते लाँच केले गेले होते. कंपनीने या वर्षात अगोदरच एक स्वस्त आयफोन एस नावाने सादर केला आहे. आयफोन १२च्या ५.४ इंची डिस्प्लेची किंमत ४७७७२ तर ६.१ इंची डिस्प्ले साठी ५५१३४ रुपये मोजावे लागतील असेही समजते. आयफोन १२ व प्रो ड्युअल कॅमेरा सेट सह तर आयफोन मॅक्स आणि प्रो ट्रिपल कॅमेरा सेट सह येतील असेही सांगितले जात आहे. हे सर्व फोन फाईव्ह जी सपोर्ट करणार आहेत.