टाटा समूहाच्या कोविड १९ टेस्टिंग किटला डीसीजीआयची मान्यता

 

फोटो साभार मशीन मेकर

जगभर करोना संदर्भात लस वा टेस्टिंग कीटसवर संशोधने सुरु असतानाच टाटा समूहाने नवीन कोविड १९ टेस्ट किट फेल्युडा नावाने तयार केले असून त्याला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या टेस्ट किट मुळे कमी खर्चात आणि कमी वेळात अचूक निदान होऊ शकणार आहेच पण या किटची किंमत सुद्धा अन्य किट पेक्षा कमी आहे. क्लस्टर्ड रेग्युलेटरी इंटरस्प्रेड शॉर्ट पॅलीनड्रोमिक रिपीटस करोना व्हायरस टेस्ट किट असे याचे संपूर्ण नाव आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी म्हणजेच सीएसआयआरचे सहकार्य हे किट बनविताना घेतले गेले आहे.

डीसीजीआय ने फेलुडाच्या सार्वजनिक वापरास परवानगी दिली आहे. हे किट विश्वसनीय मानल्या गेलेल्या आरटी-पीसीआर टेस्ट इतकेच अचूक रिपोर्ट देते असा कंपनीचा दावा आहे. इतकेच नव्हे तर रिपोर्ट कमी वेळेत आणि कमी खर्चात मिळतो. भविष्यात याच किटचा वापर अन्य साथी रोगांच्या चाचणीसाठी सुद्धा करता येणार आहे. सीआरआयएसपीआर टेस्ट म्हणजे सीएएस-९ प्रोटीनचा वापर करण्यात आलेली जगातील पहिली चाचणी असल्याचा दावा कंपनीने केला असून ही चाचणी कोविड १९ व्हायरस अचूक ओळखू शकते. हे किट मेड इन इंडिया उत्पादन आहे.