आयोडीनमुळे 15 सेंकदात नष्ट होईल कोरोना, अभ्यासात दावा


आयोडीनचा वापर करून नाक आणि चेहरा धुतल्यास कोरोना व्हायरसपासून बचाव होईल, असा दावा अमेरिकेतील एका संशोधनात करण्यात आला आहे. याआधी झालेल्या अशाच अभ्यासाच्या दाव्यांना जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळले आहे. अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधनात आढळले की, लोक आपले नाक आयोडीनने धुवत असल्यास, कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका कमी होतो.

संशोधकांनी लॅबमध्ये कोरोना व्हायरसच्या नमुन्यावर तीन वेगवेगळ्या एकाग्रतेचे अँटीसेप्टिक पोविडोन-आयोडीन (पीव्हीपी-आय टाकले. यात त्यांना आढळले की यामुळे कोरोना व्हायरसला निष्क्रिय करण्यासाठी केवळ 15 सेंकद लागले. याआधारावर संशोधकांना आयोडीनने नाक आणि चेहरा धुतल्यास कोरोनापासून बचाव होईल असा दावा केला आहे.

कोरोना व्हायरस नाकाच्या रिसेप्टर एसीई-2 चा उपयोग मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि संक्रमित करण्यासाठी करतो. संशोधनात आढळले की, पीव्हीपी-1 व्हायरससंबंधी रोगजनकांना निष्क्रिय करण्यास प्रभावी ठरला.

जेएएमए ओटोलरींगोलॉजी-हेड एंड नेक सर्जरीमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये संशोधकांनी लिहिले की, आयोडीनच्या वापरची चाचणी यशस्वी ठरली. यात आयोडीनची मात्रा 0.5 टक्के, 1.25 टक्के आणि 2.5 टक्के होती. मात्र डब्ल्यूएचओने अशाप्रकारचा दावा याआधीही फेटाळला आहे.