देवदूताप्रमाणे मदतीसाठी पुढे आला सोनू सूद, 4 महिन्यांच्या चिमुकलीचे वाचवले प्राण


कोरोना व्हायरस लॉकडाऊनपासूनच अभिनेता सोनू सूद शेकडो लोकांसाठी एखाद्या देवदूताप्रमाणे मदतीसाठी पुढे आला आहे. सोनू सूदने लॉकडाऊन दरम्यान हजारो प्रवासी कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली. आता सोनू सूद सोशल मीडियाद्वारे गरजूंची मदत करत आहे. लोक आता आपली प्रत्येक अडचण, समस्या अभिनेत्याला ट्विटरवर सांगत आहे व सोनू सूद प्रत्येकाची मदत करत आहे. अशाच एका 4 महिन्याचे प्राण सोनू सूदच्या मदतीमुळे वाचले आहेत.

आंध्र प्रदेशीमधील विजयवाडा येथील  शेख अहमद रफीने सोनूचे आभार मानत लिहिले की, सोनू सूद सर, तुम्ही माझ्या 4 महिन्यांच्या मुलीला दुसरे जीवन दिले. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले, तेव्हा विजयवाडावरून हैदराबादला बोलवून ऑपरेशन केले. केवळ पुस्तकात वाचले होते देवदूत असतात. आज विश्वास बसला. कधी भेटण्याची संधी द्या. आता तुमचे स्थान आमच्या मंदिरात आहे.

सोनू सूदने ट्विटवर या युजर्सला उत्तर दिले की, मित्रा, जीवन मी नाही देव देतो. माझे नशीब आहे मी यासाठी एक मार्ग बनलो. नेहमी आनंदी रहा.

सोनू सूदच्या प्रयत्नांमुळे या 4 महिन्यांच्या चिमुकलीचे प्राण वाचले. या कार्यासाठी अभिनेत्याचे भरभरून कौतूक केले जात आहे.