8 महिन्यात पाककडून 3186 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 17 वर्षात सर्वाधिक


भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून सीमेवरम गील 8 महिन्यात नियंत्रण रेषेजवळ जम्मू-काश्मीरमध्ये 3,186 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 17 वर्षात पहिल्यांदाच सर्वाधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. याशिवाय 1 जानेवारी ते 31 ऑगस्टदरम्यान जम्मू भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर क्रॉस बॉर्डर फायरिंगच्या देखील 242 घटना घडल्या आहेत. ही माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत सांगितले की, जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या त्यावेळी जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे.  याशिवाय उपयुक्त माध्यम आणि चॅनेल्सचा वापर करून भारताने पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर मुद्दे उपस्थित करत विरोध नोंदवला आहे. यावर्षी शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनेत 8 जवान शहीद झाले. तर 2 जवान जखमी झाले.

काल (18 सप्टेंबर) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक महिला जखमी झाली होती. वर्ष 2019 मध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या जवळपास 2000 घटना घडल्या होत्या.