अबब! ‘जोकर’च्या सीक्वलसाठी वॉकिन फीनिक्स घेणार इतके कोटी


2019 साली आलेला हॉलिवूड चित्रपट जोकर भारतासह जगभरात ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील दमदार अभिनयाने अभिनेता वॉकिन फीनिक्सने सर्वांचे मन जिंकले होते. यासाठी त्याला ऑस्कर देखील मिळाला होता. आता वॉकिन फीनिक्स जोकर चित्रपटाच्या सीक्वलमधून परतणार आहे. रिपोर्टनुसार, निर्मात्यांना वॉकिनला जोकरच्या  2 सीक्वल्ससाठी 50 मिलियन डॉलर्स म्हणजे 368 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

सध्या जोकरच्या सीक्वलबाबत केवळ चर्चा सुरू असून, याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक टॉड फिलिप्स, वॉकिन फीनिक्स किंवा निर्मात्यांकडून काहीही अधिकृत सांगण्यात आलेले नाही. मात्र जोकरच्या यशानंतर निर्माते चित्रपटाच्या सीक्वल्सवर काम करत आहेत.

ऑस्कर 2020 मध्ये जोकर चित्रपटाला 11 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये नामांकन होते. हा पहिला आर रेटेड चित्रपट आहे, ज्याने 1 बिलियन पेक्षा अधिकची कमाई केली होती.

आज तकच्या वृत्तानुसार, सध्या सीक्वल्सविषयी चर्चा सुरू आहे. स्क्रिप्ट्सवर काम सुरू आहे. पुढील 4 वर्षात चित्रपटाचे 2 सीक्वल्स आणण्याची वॉर्नर ब्रोसचा विचार आहे.