14 महिन्यांनी मैदानावर उतरणार धोनी, ट्विटरवर #WelcomeBackDhoni ट्रेंडिंग


इंडियन प्रिमियर लीगच्या 13व्या सत्राला आजपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिली लढत अबुधाबीमध्ये सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये होणार आहे. या सामन्याद्वारे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी जवळपास 14 महिन्यांनी मैदानावर उतरणार आहे. सर्वांना धोनीला पुन्हा एकदा खेळताना पाहण्याची उत्सुकता आहे. धोनीच्या स्वागतासाठी ट्विटरवर #WelcomeBackDhoni देखील ट्रेंड होत आहे.

धोनीने आपला शेवटचा सामना मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. हा वर्ल्ड कपमधील सेमी फायनलचा सामना होता. या सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला होता. यानंतर धोनीने क्रिकेटपासून काळी काळ ब्रेक घेतला होता.

महेंद्रसिंह धोनीने काही दिवसांपुर्वीच 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची देखील घोषणा केली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना पुन्हा त्याला मैदानावर हेलिकॉप्टर शॉट मारताना पाहण्याची उत्सुकता आहे.

धोनीच्या स्वागतासाठी सोशल मीडिया कालपासून मिम्स आणि ट्विटचा पाऊस पडत आहे.