अनेक देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका, पुन्हा लॉकडाऊनचे संकट


जगभरातील अनेक देशात कोरोना व्हायरस पुन्हा डोके वर काढत आहे. इस्त्रायलने कालपासून देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. 3 आठवड्यांच्या या लॉकडाऊनचे नियम कठोर आहेत. लोक आपल्या घरापासून 1 किमी लांब जाऊ शकत नाहीत. दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावणारा इस्त्रायल हा जगातील पहिला देश आहे. मात्र जगातील अनेक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येताना पाहण्यास मिळत आहे. 6 महिने निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे, ब्रिटनमध्ये दुसरी लाट येणार निश्चित आहे, असेही ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेनेही या महामारीच्या दुसऱ्या लाटेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, यूरोपमध्ये धोकादायक स्वरूपात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.

डब्ल्यूएचओचे स्थानिक संचालक हंस क्लूज म्हणाले की, मार्चमध्ये कोरोना व्हायरस सर्वोच्च स्तरावर होता, या काळात दर आठवड्याला रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यूरोपियन भागात आठवड्याला रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली.

यूरोपमध्ये अनेक देशांमध्ये मागील 10 दिवसात नवीन रुग्ण संख्येत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील 7 देशांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण दुप्पट झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 कोटी 69 लाख झाली आहे. तर जवळपास साडेनऊ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.