भल्या सकाळी अजितदादांची मेट्रो कार्यालयाला भेट 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी सकाळी सहा वाजताच पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी येथील पुणे महामेट्रोच्या कामाची कार्यालयात जाऊन पाहणी केली. करोना काळात सुद्धा अजित दादा सक्रीय राहिले आहेत. अजित दादानी या वेळी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची सुद्धा पाहणी केली आणि मेट्रोच्या ट्रायल रन मध्ये काही वेळ मेट्रोतून प्रवासही केला असे समजते. पण यामुळे शासकीय विभागाची चांगलीच धावपळ झाली असे समजते.

यावेळी अजितदादानी मेट्रोची तिकिटे कशी विकली जाणार याची माहिती घेतली तसेच लॉकडाऊन काळात मेट्रोचे काम रेंगाळले काय, मजूर कमी पडत नाहीत ना अशी चौकशी केली. राज्यात शरद पवार आणि अजित दादा वेळेबाबत अधिक दक्ष असल्याचे सांगितले जाते.

अजितदादा सकाळच्या वेळी अधिक कार्यक्षम असतात असे बोलले जाते. राज्यात अजितदादांच्या कार्यक्षमतेबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. या वर्षाच्या सुरवातीला जानेवारी अखेरी अजित दादांनी सकाळीच नाशिक विकास कार्यालायचे भूमिपूजन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर हात मिळवणी करून भल्या सकाळीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली होती. त्यावेळी तो मोठा चर्चेचा विषय बनला होता.