हायहिल्स’ चपला घाला, शॉपिंग एक्सपर्ट व्हा

वॉशिंग्टन – पायाला भल्या मोठ्या शिड्या लावून चारचौघांत मिरवणं म्हणजे तमाम महिलावर्गाचा एक स्टेटस सिम्बॉल.मात्र आता हायहिल्स घातल्याने तुम्ही चांगल्या प्रकारे शॉपिंग करु शकतात असा नवा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हायहिल्स घातलेल्या महिला वैचारिकरित्या संतुलित असतात. त्यामुळे त्या खरेदी करताना सारासार विचार करतात, असं या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिगॅम यंग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जेफ्री लार्सन यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला खरेदीची आवड असेल तर सर्वसाधारणपणे त्यासाठी तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च करतात. पण शॉपिंगला जाताना तुम्ही हायहिल्स घातले असतील तर मग तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खर्च करणं टाळता. कारण हायहिल्स घातल्याने तुम्ही मानसिकरित्या स्थिर असतात. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शॉपिंगवर होतो.


 

Leave a Comment