एलजीने सादर केला बजेट स्मार्टफोन क्यू ३१

कोरियन टेक कंपनी एलजीने बजेट सेगमेंट मधील नवा स्मार्टफोन एलजी क्यू ३१ द. कोरियामध्ये सादर केला असून त्याची विक्री २५ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. हा फोन भारतीय बाजारात कधी येणार याचा खुलासा अद्याप केला गेलेला नाही. या फोनसाठी डेडीकेटेड गुगल असिस्टंट हे खास फिचर युजरला मिळणार आहे. म्हणजे युजरला गुगल असिस्टंट वापरायचे असेल तर फक्त एक बटण दाबावे लागेल. या फोनची किंमत भारतीय रुपयात १३२०० आहे.

या फोनसाठी ५.७ इंची एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज सह असलेल्या या फोन साठी मायक्रोकार्ड सुविधा असून त्यामुळे २ टीबी डेटा स्टोर करणे शक्य होणार आहे. अँड्राईड १० ओएस, ड्युअल रिअर कॅमेरा असून त्यातील प्रायमरी कॅमेरा १३ एमपीचा तर दुसरा कॅमेरा ५ एमपीचा वाईड अँन्गल सेन्सर आहे. व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. सिल्व्हर कलर मध्ये हा फोन मिळणार आहे.