चीनने लॅबमध्ये तयार केला कोरोना, पुरावा देणाऱ्या वैज्ञानिकाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड


ट्विटरने चीनी वायरोलॉजिस्ट ली-मेंग यान यांचे सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड केले आहे. कोरोना व्हायरस  वुहान लॅबमध्ये तयार केल्याचा दावा केल्यामुळे चीनी वैज्ञानिकांनी ली-मेंग यान चर्चेत आल्या होत्या. त्यांचे म्हणणे आहे की, या खुलाशानंतर त्यांना हाँगकाँग विद्यापीठातील नोकरी सोडवावी लागली व प्राण वाचविण्यासाठी दुसऱ्या देशात जावून राहावे लागले.

आज तकच्या वृत्तानुसार, चीनवर जाणुनबुजून कोरोना व्हायरस बनविण्याचा आरोप केल्यानंतर यान यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणारे अकाउंट ट्विटर निलंबित करत असते.

ट्विटरने ली-मेंग यान यांचे अकाउंट सस्पेंड करण्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सांगण्यात येते की मायक्रोब्लॉगिंग साइटने मे महिन्यात ट्विटरसवर चेतावणी संदेश देण्यास सुरुवात केली होती. यात कोरोना व्हायरस बनविण्याचा वादग्रस्त दाव्याचा देखील समावेश होता. एखाद्या विशिष्ट ट्विटमुळे यान यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले का, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

दरम्यान, याआधी डॉक्टर ली मेंग यान यांनी कोरोना लॅबमध्ये तयार झाल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटले होते व त्यांनी तीन संशोधकांसोबत मिळून पुरावा सादर देखील केला होता.