लोकांनी विचारले वाढदिवसाचे गिफ्ट काय हवे ?, पंतप्रधानांनी दिली लांबलचक यादी


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल 70वा वाढदिवस होता. या निमित्ताने भाजपने देशभरात विविध कार्यक्रम केले. सोशल मीडियावर देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकीय नेत्यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनेकांनी त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट काय हवे असा प्रश्न देखील विचारला. यावर पंतप्रधानांनी काल मध्यरात्री ट्विट करत आपली विश लिस्ट शेअर केली आहे.

पंतप्रधानांनी ट्विट करत सांगितले की त्यांना काय हवे आहे. त्यांनी लिहिले, मला लोकांनी विचारले की आपल्या वाढदिवशी काय हवे आहे. या त्या गोष्टी आहेत, ज्या मला हव्या आहेत –  मास्क वापरत रहा आणि योग्यप्रकार घाला. सोशल डिस्टेंसिंगचे पालन करा. ‘दो गज की दूरी’ लक्षात ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. आपल्या जगाला निरोगी बनवूया.

याआधी पंतप्रधान मोदींनी देश आणि जगभरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले.