गुगलने प्ले स्टोरवरून हटवले पेटीएम, पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप


भारतातील दिग्गज पेमेंट कंपनी पेटीएमला गुगलने मोठा झटका दिला आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोरवरून पेटीएमचे अ‍ॅप्लिकेशन हटवले आहे. कंपनीवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आले आहे. पेटीएमने ट्विट करत माहिती दिली की, प्ले स्टोरवर काही काळासाठी हे अ‍ॅप उपलब्ध नसेल. पेटीएमचे पेटीएम फर्स्ट गेम्स अ‍ॅप देखील प्ले स्टोरवरून हटविण्यात आले आहे.

पेटीएमने ट्विट करत माहिती दिली की, डिअर पेटीएमर्स, पेटीएम अँड्राईड अ‍ॅप नवीन डाउनलोड करण्यासाठी आणि अपडेटसाठी सध्या उपलब्ध नाही. आम्ही लवकरच परत येऊ. तुमचे पैसे सुरक्षित असून, तुम्ही नेहमीप्रमाणेच अ‍ॅप वापरू शकता.

दरम्यान, पेटीएमने काही दिवसांपुर्वीच फँटेसी क्रिकेट टुर्नामेंट सुरू केले होते. यावर गुगलने पॉलिसीचे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता. गुगलने देखील याबाबत एक निवेदन जारी करण्यात आले आहे. गुगलने म्हटले की, आम्ही ऑनलाईन कसिनो किंवा कोणत्याही प्रकारच्या अनियमित गँबलिंग अ‍ॅप जे स्पोर्ट्समध्ये सट्टा लावण्याची सुविधा देते, त्याला प्लॅटफॉर्मवर राहण्याची परवानगी देत नाही. हे आमच्या पॉलिसीचे उल्लंघन आहे.