कौतुकास्पद! या देशाची राजकुमारी घेत आहे मिलिट्री ट्रेनिंग


सर्व साधारणपणे राजकीय नेतेमंडळींची मुले सैन्यात भरती झालेली दिसत नाही. जसा प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, तसा या गोष्टीलाही आहेच. अनेक नेते आवडीने देशासाठी मुलांना सैन्यात भरती करतात. अशाच एका देशाच्या राजकुमारीने स्वतः मिलिट्री ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आहे. बेल्जियमची राजकुमारी 18 वर्षीय एलिजाबेथ यांनी Butgenbach येथील एलिसनबोर्न बेल्जियम आर्मी कॅम्पमध्ये सहभागी होत मिलिट्री ट्रेनिंग घेतले. यासाठी त्यांचे विशेष कौतुक देखील होत आहे.

राजकुमारी एलिजाबेथ यांचे वडील राजा फिलिप यांनी देखील 1978 ते 1981 या काळात कॅम्पमध्ये मिलिट्री ट्रेनिंग घेतले होते. मे महिन्यात बेल्जियमच्या रॉयल पॅलेसने निवेदन जारी करत सांगितले होते की, राजकुमारी एलिजाबेथ देखील मिलिट्री ट्रेनिंग घेणार आहेत. 15 सप्टेंबरपासून त्यांचे ट्रेनिंग सुरू झाले आहे.

या कॅम्पममध्ये दरवर्षी केवळ 150 विद्यार्थी येतात. त्यांनी लष्कर, नौदल, हवाई दल आणि मेडिकल ब्रांचसाठी तयार केले जाते. एलिजाबेथ शाही कुटुंबातील पहिल्या महिला आहेत, ज्यांनी अशाप्रकारचे ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्या काही ठिकाणी बंदूक चालवताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी धावताना दिसत आहेत.