भारतात लाँच झाली दमदार ‘किआ सॉनेट’ एसयूव्ही


किओ मोटर्सने कॉम्पॅक्ट एसयूव्ही किआ सॉनेटला आज भारतात लाँच केले. कंपनी या दमदार एसयूव्हीला भारतात 6.71 लाख रुपये (एक्स शोरुम) सुरुवाती किंमतीत लाँच केले आहे. कंपनीने ट्रिम लाइन, 4 इंजिन आणि 5 गिअर पर्यांयासह किआ सॉनेट एसयूव्हीला 15 व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. या एसयूव्हीला सर्वात प्रथम 2020 ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. ही एसयूव्ही मारुती ब्रेझा आणि ह्युंडाई वेन्यूला टक्कर देईल. सोनेट किआ मोटर्सची भारतातील तिसरी कार आहे.

Image Credited – Autocar India

किआ सोनेट एसयूव्हीच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 6.71 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 10.39 लाख रुपये आहे. किआ सोनेटमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहे. याच्या प्रिमियम फीचर्सबद्दल सांगायचे तर यात बोसचा प्रिमियम स्पीकर्स सेटअप, यूव्हीओ कनेक्टेड एअर फ्यूरिफायर, वेन्टीलेटेड फ्रंट सीट्ससोबत 6 एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, व्हिकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आणि ब्रेक असिस्ट सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Image Credited – motoroids

इंजिनबद्दल सांगायचे तर कंपनीने किओ सोनेटमध्ये 2 पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला आहे. यात पहिले 1.2 लीटरचे नॉन टर्बोचार्ज्ड इंजिन आहे, तर दुसरे 1.0 लीटरचे टर्बो पेट्रोल यूनिट आहे. 1.2 लीटरचे इंजिन 84bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 115Nm पीक टॉर्क जनरेट करते.  या पेट्रोल इंजिनमध्ये स्टँडर्ड 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन देम्यात आले आहे. तर टॉप स्पेक 1.0 लीटर इंजिन 119bhp पावर आणि 172Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7 स्पीड DCT आणि 6 स्पीड (iMT) इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रांसमिशनने सुसज्ज आहे.