कोरोना व्हायरसचा सर्वात प्रथम फटका बसल्यानंतर आता उत्तर पुर्व चीनमधील हजारो लोकांना बॅक्टेरियल इंफेक्शन झाले आहे. हे बॅक्टेरियल इंफेक्शन लस बनविणारी सरकारी बायोफार्मास्युटिकल प्लांटमधील गळतीमुळे पसरले. आरोग्य अधिकार्यांनी सांगितले की, 30 लाख लोकसंख्या असणाऱ्या लांझू येथे जवळपास 3,245 लोकांना ब्रूसेलोसिस (Brucellosis) झाला आहे. मेडिटरेनियन फिव्हर नावाने ओळखला जाणारा हा आजार संसर्ग झालेल्या प्राणी किंवा त्यांच्या उत्पादनांमधून पसरतो. या आजारात ताप, स्नायूमध्ये वेदना आणि डोकेदुखी होते.
धक्कादायक! चीनमध्ये कोरोनानंतर आता फॅक्ट्रीतील गळतीमुळे पसरला बॅक्टेरिया
आतापर्यंत या संसर्गामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. चीनच्या अधिकाऱ्यांना सांगितले की हा आजार एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरत नाही. आतापर्यंत जवळपास 22 हजार लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.
चीनच्या प्रशासनाला आढळले की, येथे प्राण्यांसाठी Brucell लस बनवली जात होती. बायोफार्मास्युटिकल प्लांटने एक्सपायर झालेल्या किटकनाशकांचा वापर केला. त्यामुळे फॅक्ट्रीमधून बॅक्टेरिया पुर्णपणे कधी नष्ट झाला नाही व संक्रमण पसरले. या प्रकारचा बॅक्टेरिया गाई-म्हशी, डुक्कर यांच्याद्वारे अधिक पसरतो.