प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेला भारतात सुरू होणारे अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोर


अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅपलच्या भारतातील पहिल्या ऑनलाईन स्टोरविषयी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आता अखेर अ‍ॅपलचे भारतातील  पहिले वहिले ऑनलाईन स्टोर 23 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत अ‍ॅपलचे फिजिकल स्टोर नाही व स्वतः कंपनी ऑनलाईन प्रोडक्ट्स देखील विकत नाही.

अ‍ॅपलनुसार, कंपनीच्या ऑनलाईन स्टोरवरून ग्राहक आता थेट अ‍ॅपलचे प्रोडक्ट्स खरेदी करू शकतील व येथूनच त्यांना सर्व्हिस सपोर्ट देखील मिळेल. आतापर्यंत अ‍ॅपलचे प्रोड्क्टस भारतात कंपनीच्या ऑथराइज्ड स्टोरवर मिळत असे किंवा ई-कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करावे लागत असे.

कंपनीने म्हटले आहे की, अ‍ॅपल ऑनलाईन स्टोर कस्टमर्सला तसाच शानदार अनुभव मिळेल, जसा जगभरातील अ‍ॅपल स्टोर्समध्ये मिळतो. ऑनलाईन स्टोर्समधून ग्राहकांना प्रोडक्ट्सबद्दल इंग्रजी आणि हिंदीमध्ये माहिती मिळेल. अ‍ॅपल स्पेशलिस्टकडून मॅक कॉन्फिगरपासून ते नवीन डिव्हाईस सेटअपची देखील माहिती मिळेल.

कंपनीच्या ऑनलाईन स्टोर्सवर अनेक ऑफर्स देखील मिळतील. अ‍ॅपल केअर+ आणि एक्सेसरीजवर सूट मिळेल. फेस्टिव्ह सीझन दरम्यान वस्तूंवर सिग्नेचर गिफ्ट रॅप आणि वैयक्तिक डिजाईन देखील ग्राहक निवडू शकतील. वस्तूंवर हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलगू भाषेत नाव लिहिता येईल.